स्तोत्रसंहिता
धडा 92
1 परमेश्वराची स्तुती करणे चांगले असते. परात्पर देवा, तुझ्या नावाचे उपकारस्मरण करणे चांगले असते.
2 तुझ्या प्रेमा बद्दल सकाळी गाणे आणि रात्री तुझ्या इमानीपणाबद्दल जयजयकार करणे चांगले असते.
3 देवा, तुझ्यासाठी दहा तारांच्या वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले असते.
4 परमेश्वरा, तू ज्या गोष्टी केल्यास त्यामुळे तू आम्हाला खरोखरच सुखी केले आहेस, आम्ही त्याबद्दल आनंदाने गातो.
5 परमेश्वरा, तू फारच महान गोष्टी केल्यास तुझे विचार समजून घेणे आम्हाला फार जड जाते.
6 तुझ्याशी तुलना करता माणसे म्हणजे मूर्ख जनावरे आहेत. ज्याला काहीही कळू शकत नाही अशा मूर्खासारखे आम्ही आहोत.
7 वाईट लोक तणाप्रमाणे जगतात आणि मरतात. ते ज्या कवडीमोलाच्या गोष्टी करतात, त्या गोष्टींचा कायमचा नाश होतो.
8 परंतु परमेश्वरा, तुला सदैव मान मिळेल.
9 परमेश्वरा, तुझ्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल. वाईट गोष्टी करणाऱ्या सर्व लोकांचा नाश होईल.
10 पण तू मला बलवान बनवशील. मी ताकदवान शिंग असलेल्या मेंढ्यासारखा असेन. पण तू माझी माझ्या खास कामासाठी निवड केलीस. तू तुझे ताजेतवाने करणारे तेल माझ्यावर ओतलेस.
11 मी माझे शत्रू माझ्याभोवती बघतो. ते भल्या मोठ्या बैलाप्रमाणे माझ्यावर चालकरुन येण्याच्या तयारीत आहेत. ते माझ्याबद्दल काय बोलतात ते मी ऐकतो.
12 परंतु चांगला माणूस वाढणाऱ्या खजुराच्या झाडाप्रमाणे असतो.चांगला माणूस लबानोनमधल्या मोठ्या देवदार वृक्षासारखा असतो.चांगली माणसे परमेश्वराच्या मंदिरात लावलेल्या मजबूत वृक्षासारखी असतात. आमच्या देवाच्या मंदिरातील अंगणात ती झपाट्याने वाढतील.
13
14 ते जुने झाल्यावरही फळे देत राहातील. ते सशक्त हिरव्या झाडासारखे असतील.
15 परमेश्वर चांगला आहे हे प्रत्येकाला दाखवण्यासाठी ती (चांगली माणसे) तेथे आहेत तो माझा खडक असून तो काहीही चुकीचे करत नाही.