स्तोत्रसंहिता
धडा 20
1 जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्वप्रास करुन देवो.
2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो. तो तुम्हाल सियोनातून साहाय्य करो.
3 तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
4 तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो. तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.
5 देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल. देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
6 परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले. देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत च निवडलेल्या राजाला उत्तर दिले. देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.
7 काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यावर विश्वास ठेवतात परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
8 त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला. ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.
9 परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले. देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.