स्तोत्रसंहिता
धडा 114
1 इस्राएलने मिसर देश सोडला. याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला.
2 यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले.
3 लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला. यार्देन नदी वळली आणि पळाली.
4 पर्वत मेंढ्यांसारखा नाचला. टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.
5 लाल समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस?
6 पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात? आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात?
7 पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या देवासमोर थर थर कापली.
8 देवानेच खडकातून पाणी वहायला लावले. देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले.