स्तोत्रसंहिता
धडा 136
1 परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
2 देवांच्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
3 परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
4 देवाची, जो एकमेव अद्भुत चमत्कार करतो त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
5 ज्याने आकाश निर्माण करण्यासाठी शहाणपणा वापरला त्याची, देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
6 देवाने समुद्रावर शुष्क जमीन ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
7 देवाने मोठा प्रकाश निर्माण केला. त्याचे प्रेम सदैव असते.
8 दिवसावर राज्य करण्यासाठी देवाने सूर्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
9 देवाने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि चांदण्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
10 देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या पहिल्या पुरुषांना आणि प्राण्यांना मारले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
11 देवाने इस्राएलला मिसरमधून बाहेर काढले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
12 देवाने त्याची महान शक्ती आणि बळ दाखविले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
13 देवाने लाल समुद्र दोन भागात विभागला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
14 देवाने इस्राएलला समुद्रामधून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
15 देवाने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात बुडवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
16 देवाने त्याच्या माणसांना वाळवंटातून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
17 देवाने शक्तिशाली राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
18 देवाने बलवान राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
19 देवाने अमोऱ्यांच्या सिहोन राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
20 देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
21 देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
22 देवाने ती जमीन इस्राएलला नजराणा म्हणून दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
23 आमचा पराभव झाला तेव्हा देवाने आमची आठवण ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
24 देवाने आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
25 देव प्रत्येक माणसाला अन्न देतो. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
26 स्रवर्गातल्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.