स्तोत्रसंहिता
धडा 138
1 देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन.
2 देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरासमोर नतमस्तक होतो. मी तुझ्या नावाची, तुझ्या खऱ्या प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो. तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिध्द आहेस. आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस.
3 देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली आणि तू मला होकार दिलीस. तू मला शक्ती दिलीस.
4 परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील तेव्हा ते तुझी स्तुती करतील.
5 ते परमेश्वराच्या पध्दतीचे गुणगान करतील कारण परमेश्वराची महिमा अगाध आहे.
6 देव फार म्हत्वाचा आहे पण तो दुबळड्यालोकांचा कैवारी आहे गर्विष्ठ लोक काय करतात ते देवाला माहीत आहे परंतु तो त्यांच्यापासून दूर राहातो.
7 देवा, मी जर संकटात सापडलो तर मला जिवंत ठेव. जर माझे शत्रू माझ्यावर रागावले तर त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
8 परमेश्वरा, तू कबूल केलेल्या वस्तू मला दे. परमेश्वरा, तुझे खरे प्रेम सदैव असते. परमेश्वरा, तू आमची निर्मिती केलीस, आता आम्हाला सोडू नकोस.