यहेज्केल
धडा 1
1 मी बूजीचा मुलगा याजक यहेज्केल. मी परागंदा झालो होतो. मी खास्द्यांच्या देशात खबार कालव्याच्या काठी असताना आकाश दुभंगले व मला देवाचा दृष्टान्त झाला. 30व्या वर्षीच्याचौथ्या महिन्याच्या (जूनच्या) पाचव्या दिवसाची ही घटना आहे.यहोयाखीन राजाच्या परागंदा होण्याच्या काळातील 5 व्या वर्षी, महिन्याच्या 5 व्या दिवशी, यजेज्केलला परमेश्वराचा शब्द प्राप्त झाला.
2
3 तेथेच त्याला परमेश्वराची शक्ती प्राप्त झाली.उत्तरेकडून एक धुळीचे वादळ येताना मी (यहेज्केलने) पाहिले. तो एक मोठा ढग होता आणि त्यातून आगीचा झोत बाहेर पडत होता. त्याच्याभोवती प्रकाशाची प्रभा फाकली होती. आगीत धगधगणाऱ्या तप्त धातू प्रमाणे तो दिसत होता
4
5 त्यामध्ये चार प्राणी होते. ते मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसत होते.
6 पण त्या प्रत्येक प्राण्याला चार तोंडे आणि चार पंख होते.
7 त्यांचे पाय सरळ होते. त्यांच्या पायांचे तळवे गाईच्या खुरांप्रमाणे होते. ते चकाकी दिलेल्या पितळेप्रमाणे चमकत होते.
8 त्यांच्या पंखाखाली मानवी हात होते. ते चार प्राणी होते. त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते.
9 त्यांचे पंख एकमेकांना स्पर्श करत होते. ते चालताना वळत नव्हते. ते ज्या दिशेकडे पाहत, त्याच दिशेला जात होते.
10 प्रत्येक प्राण्याला चार तोंडे होती. प्रत्येकाचे समोरचे तोंड माणसाचे होते. उजव्या बाजूला सिंहाचे, डाव्या बाजूला बैलाचे व मागच्या बाजूला गरुडाचे तोंड होते. ते चारहीजण दिसायला अगदी सारखे होते.
11 ते प्राणी पंखांचा उपयोग स्वत:ला झाकण्यासाठी करीत. दोन पंखांनी ते जवळ असलेल्या प्राण्याला स्पर्श करीत. ते दोन पंखांनी अंग झाकीत.
12 ते पाहत होते त्याच दिशेने जात होते. वाराजेथे नेईल, तेथे ते गेले. पण चालताना ते वळत तव्हते.
13 ते प्राणी असे दिसत होते: प्राण्यांच्या मध्थेन काहीतरी जळत्या निखाऱ्याप्रमाणे होते. लहान लहान मशाली प्राण्यांमधून आणि त्यांच्या सभोवती फिराव्या तसा तो अग्नी दिसत होता. तो प्रकाश झगझगीतपणे चमकत होता आणि त्यातून वीज चमकत होती.
14
15 मी प्राण्यांकडे पाहात होतो तेव्हा मला जमिनीला टेकलेली चार चाके दिसली. प्रत्येक प्राण्यासाठी एक चाक होते. सर्व चाके सारखीच दिसत होती. ती तेजस्वी वैदुर्यापासून केल्याप्रमाणे दिसत होती. एकात दुसरे चाक असल्याप्रमाणे ती दिसत होती.
16
17 चाके चालताना कुठल्याही दिशेला वळत पण चाके चालताना प्राणी वळत नव्हते.
18 चाकांच्या धावा उंच आणि भयंकर होत्या. चारही चाकांच्या धावांवर सर्वत्र डोळे होते.
19 चाके त्या प्राण्यांबरोबरच फिरत. जर ते प्राणी आकाशात उडाले, तर त्यांच्याबरोबर चाकेही उचलली जात.
20 वारा नेईल तिकडे ते जात व त्याप्रमाणे चाकेही जात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) चाकांत होता.
21 म्हणून जर प्राणी हालले, तर चाकेही फिरत. प्राणी थांबले की चाकेही थांबत. जर चाके हवेत उडाली, तर प्राणीही वर जात. का? कारण वारा चाकांत होता.
22 त्या प्राण्यांच्या डोक्यांवर विलक्षण असे काहीतरी होते. वाडगापालथा घालावा तसे ते दिसत होते. तो वाडगा स्फटिकाप्रमाणे स्वच्छ होता.
23 ह्या वाडग्याखाली, प्रत्येक प्राण्याला पंख होते आणि ते जवळच्या दुसऱ्या प्राण्यापर्यंत पोहोचू शकत होते. दोन पंख एका बाजूला व दोन पंख दुसऱ्या बाजूला पसरवून ते अंग झाकीत.
24 मग मी पंखांचा आवाज ऐकला. प्राण्यांनी हालचाल करताच पंखाचा प्रचंड आवाज होई. तो आवाज प्रचंड पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे होता. सर्वशक्तिमान देव चालताना व्हावा, तसा तो आवाज मोठा होता. सैन्याच्या आवाजाप्रमाणे अथवा लोकांच्या प्रचंड गर्दीच्या आवाजासारखा तो आवाज होता. प्राणी थांबताच, त्यांचे पंख त्यांच्या बाजूला खाली येत.
25 ते प्राणी थांबले व त्यांनी आपले पंख खाली केले. मग दुसरा एक खूप मोठा आवाज झाला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला.
26 त्या वाडग्यावर काहीतरी होते. ते सिंहासनाप्रमाणे दिसत होते. ते इंद्रनीलाप्रमाणे गर्द निळे होते. त्यावर माणसाप्रमाणे दिसणारी आकृती बसलेली होती.
27 मी त्याचा कमरेवरचा भाग पाहिला. तो तप्त धातू प्रमाणे दिसत होता. त्याच्या भोवती आगीचा लोळ असल्याप्रमाणे दिसत होते. मी त्याच्या कमरेखालच्या भागाकडे पाहिले. तो आगीप्रमाणे दिसत होता. त्याच्या सभोवती प्रभा फाकली होती.
28 त्याच्या भोवती फाकलेले तेज इंद्रधनुष्याप्रमाणे होते. ते परमेश्वराच्या वैभवाच्या तेजाप्रमाणे दिसत होते. म्हणून मी ते पाहाताच जमिनीवर पालथे पडून, मस्तक टेकवून वंदन केले. त्या नंतर, माझ्याशी कोणीतरी बोलत असल्याचे मला ऐकू आले.