प्रेषितांचीं कृत्यें

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28

धडा 4

1 पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना, काही लोक त्यांच्याकडे आले. त्यातील काही यहूदी याजक, मंदिराचे रक्षण करणाऱ्या शिपायांचा कप्तान व काही सदूकी लोक होते.
2 ते चिडले होते. कारण दोन प्रेषित लोकांना शिकवीत होते. पेत्र व योहान लोकांना शिकवीत होते की, येशूच्या सामर्थ्याने मेलेली माणसे पुन्हा उठतील.
3 यहूदी पुढाऱ्यानी व नियमास्त्र शिक्षकांनी पेत्र व योहानाला धरले व तुरुंगात टाकले. अगोदरच रात्र झाली होती, म्हणून त्यांनी पेत्र व योहान यांना दुसऱ्या दिवसापर्यंत तुरुंगात ठेवले.
4 परंतु पेत्र व योहान यांचा संदेश ऐकणाऱ्या पुष्कळ लोकांनी, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला. विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये सुमारे पाच हजार लोक होते.
5 दुसऱ्या दिवशी यहूदी लोकांचे पुढारी, वडीलजन, व नियमशास्त्र शिकविणारे शिक्षक यरुशलेममध्ये एकत्र जमले.
6 हन्ना (प्रमख याजक), केफा, योहान आणि अलेक्यांद्र हे तेथे होते. तसेच प्रमुख याजकाच्या घरातील प्रत्येक जण हजर होता.
7 त्यांनी पेत्र व योहान यांना सर्वांसमोर उभे राहण्यास सांगितले, यहूदी पुढाऱ्यांनी पुष्कळ वेळ त्यांना विचारले. “या लंगड्या माणसाला तुम्ही कसे बरे केले? कोणत्या शक्तीचा उपयोग तुम्ही केला? कोणाच्या अधिकाराने हे तुम्ही केले?”
8 मग पेत्र पवित्र आत्म्याने भरला गेला. तो त्यांना म्हणाला, “अहो पुढाऱ्यांनो आणि वडीलधारी लोकांनो;
9 या लंगड्या माणासाच्या बाबतीत जी चांगली गोष्ट झाली त्याबद्दल तुम्ही आम्हांला प्रश्न विचारीत आहात काय? तुम्ही आम्हांला विचारीत आहात का की याला कोणी बरे केले?
10 तुम्ही सर्वांनी आणि यहूदी लोकांनी समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे, ती ही की, नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने हा मनुष्य बरा झाला! तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. देवाने त्याला मरणातून उठविले. हा मनुष्य लंगडा होता, पण आता तो चांगला झाला आहे. आणि येशूच्या सामर्थ्यामुळे तुमच्यासमोर उभा राहू शकत आहे!
11 ‘तुम्ही बांधणारांनी जो दगड नापसंत केला, जो पुढे कोनशिल झाला तोच हा येशू होय.’
12 येशू हा एकमेव आहे जो लोकांना तारु शकेल. त्याचे नाव हेच सामर्थ्य फक्त जगामध्ये आहे जे लोकांना तारण्यासाठी दिले आहे, आमचे तारण येशूद्वारे झालेच पाहिजे!”
13 यहूदी लोकांना समजले की, पेत्र व योहान यांचे खास प्रशिक्षण किंवा शिक्षण झालेले नाही. पण पुढाऱ्यांनी हे सुद्धा पाहिले की, पेत्र व योहान बोलायला घाबरत नव्हते. म्हणून पुढारी आश्चर्यचकित झाले. मग त्यांना उमगले की, पेत्र व योहान येशूबरोबर होते.
14 त्यांनी पाहिले की, तो लंगडा मनुष्य तेथे दोन प्रेषितांसह उभा आहे. त्यांनी पाहिले की, तो मनुष्य बरा झालेला आहे. म्हणून ते प्रेषितांविरुद्ध काही बोलू शकत नव्हते.
15 यहूदी पुढारी त्यांना म्हणाले की, त्यांनी सभा सोडून जावे. मग पुढारी काय करायला हवे याविषयी एकमेकांमध्ये विचारविनिमय करु लागले.
16 ते म्हणाले, “या मनुष्यांचे आपण काय करावे? यरुशलेममधील प्रत्येक व्यक्ति हे जाणतो की, त्यांनी एक महान चमत्कार केला आहे, हे स्पष्ट आहे. आपण असे म्हणू शकत नाही की ते खरे नाही.
17 परंतु आपण त्यांना त्या माणसाविषेयी (येशूविषयी) सांगण्यास (प्रतिबंध करु) घाबरुन सोडू. मग ही समस्या लोकांमध्ये पसरणार नाही.”
18 मग यहूदी पुढान्यांनी पेत्र व योहान यांना परत आत बोलाविले. त्यांनी प्रेषितांना सांगितले की, येशूच्या नावाने काही करु नका व शिकवू नका.
19 पण पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणते बरोबर वाटते? देव काय इच्छितो? आम्ही तुमची की देवाची आज्ञा पाळायची?
20 आम्ही शांत बसू शकत नाही. आम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्या आम्हांला सांगितल्याच पाहिजेत.”
21 प्रेषितांना शिक्षा करण्याचा मार्ग त्यांना सापडेना; कारण जे काही घडले होते त्याविषयी लोक देवाची स्तुति करीत होते. (हा चमत्कार देवाकडून घडला होता. शिवाय जो बरा झाला होता, तो चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.) म्हणून यहूदी पुढाऱ्यांनी प्रेषितांना पुन्हा ताकीद दिली व त्यांना सोडून दिले.
22
23 पेत्र व योहान यांची सुटका झाल्यावर ते त्यांच्या स्वत:च्या बंधुवर्गाकडे परत गेले. त्यांनी प्रमुख याजक व प्रमुख वडील यहूदी पुढारी जे बोलले ते सर्व त्यांनी बंधुवर्गांस सांगितले.
24 जेव्हा विश्वासणाऱ्यांनी हे ऐकले, तेव्हा त्या सर्वांनी एक मनाने देवाला प्रार्थना केली. ते म्हणाले, “सर्वसमर्थ प्रभु, तूच आकाश, जमीन, समुद्र व जगातील सर्वांचा निर्माणकर्ता आहेस.
25 आमचा पिता दावीद हा तुझा सेवक होता. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्याने हे शब्द लिहिले:‘राष्ट्रे का ओरडत आहेत? लोक (देवाविरुद्ध) का व्यर्थ कट रचित आहेत?
26 या भूतलावरील राजे लढाईसाठी सज्ज झाले आणि प्रभु परमेश्वर व त्याचा रिव्रस्त यांच्याविरुद्ध एकवट झाले आहेत.’ स्तोत्र. 2:1-2
27 या गोष्टी खरोखर घडल्या, जेव्हा हेरोद.पंत पिलात, यहूदीतर राष्ट्रे व यहूदी लोक हे सर्व जण येशूविरुद्ध ‘एकत्र आले.’
28 त्यांनी तुझी योजना प्रत्यक्षात आणली, हे सर्व तुइया सामर्थ्याने व तुइया इच्छेने घडले.
29 आणि आता प्रभु, ते काय म्हणत आहेत ते ऐक. ते आम्हांला भेडसावण्याचा प्रयत्न करीन आहेत! प्रभु, आम्ही तुझे सेवक आहोत, तुला आम्ही जे बोलावे असे वाटते ते न भीता बोलण्यासाठी आम्हांला मदत कर.
30 तुझे सामर्थ्य दाखवून आम्ही धीट बनण्यासाठी आम्हांला मदत कर; आजारी लोकांना बरे कर, पुरावे दे आणि चमत्कार कर, जे येशू जो तुझा पवित्र सेवक याच्या सामर्थ्यांने घडतील.’
31 विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना केल्यावर, ज्या ठिकाणी ते एकत्र जमले होते ती जागा हादरली, ते सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले. व ते न भीता देवाचा संदेश सांगत गेले.
32 विश्वासणाऱ्यांचा हा परिवार एक मनाने व ऐक्याने राहत असे. ते एकचित्त होते. परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे. उलट प्रत्येक गोष्ट ते वाटून घेत.
33 मोठ्या सामर्थ्याने प्रेषित लोकांना प्रभु येशू मेलेल्यांतून उठला याविषयी साक्ष देत. आणि त्या विश्वासणाऱ्यांवर देवाचा मोठा आशीर्वाद होता.
34 त्यांना आवश्यकता भासे ते सर्व त्यांना मिळत असे. प्रत्येक जण ज्याची स्वत:ची शेत (जमीन) होती किंवा घर होती, त्यांनी ते पैशासाठी विकले व विकून आलेले पैसे त्यांनी प्रेषितांच्या हवाली केले.
35 आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार पुरवठा केला जात असे.
36 एका विश्वासणाऱ्याचे नाव होते योसेफ. प्रेषित त्याला बर्णबा म्हणत. (याचा अर्थ, “जो इतरांना मदत करतो तो मनुष्य.”) तो लेवी वंशातला होता. आणि कुप्र बेटावर जन्मलेला होता.
37 योसेफाचे स्वत:चे शेत होते, ते त्याने विकले व पैसे त्याने प्रेषितांकडे दिले.