प्रकटीकरण

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22

धडा 1

1 हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे, ते आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी देवानेयेशूला हे देवापासून प्राप्त झाले ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला दाखविण्यास सांगितले.
2 योहानाने जे काही पाहिले त्या सर्व गोष्टींविषयी साक्ष दिली की येसू ख्रिस्ताने हे त्याला सांगितले; देवाकडून आलेला हासंदेश आहे.
3 जी व्यक्ती देवाकडून आलेल्या या संदेशाचे शब्द उघडपणे वाचते ती धन्य आहे. आणि जे लोक हा संदेशऐकतात आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत. कारण आता जास्त वेळ उरला नाही.
4 योहानाकडून, आशियाप्रांतातील सात मंडळ्यांना:जो आहे, जो होता व जो येणार आहे त्या एकापासून (देवापासून): आणि त्याच्या सिंहासनासमोरील सात आत्म्यांकडूनतुम्हांस कृपा व शांति असो.
5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी आहे, जो मेलेल्यांमधून उठविले गेलेल्यांमध्ये पहिला आहे.पृथ्वीवरील राजांचा तो सत्ताधीश आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासूनत्याच्या रक्ताने मुक्त केले;
6 ज्याने आम्हांला राज्य आणि देवपित्याची सेवा करणारे याजक बनविले त्या येशूला गौरव वसामर्थ्य अनंतकाळपर्यंत असोत! आमेन.
7 पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक व्यक्ति त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले ते सुद्धा त्याला पाहतील. पृथ्वीवरीलसर्व लोक त्याच्यामुळे आक्रोश करतील, होय, असेच होईल! आमेन.
8 प्रभु देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगाआहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे.”
9 मी योहान आहे, आणि मी तुमचा बंधु आहे. आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि आपण या गोष्टींमध्ये वाटेकरीआहोत. दु:खसहनात, राज्यात, धीराने सहन करण्यात, येशूच्या सत्यात आणि देवाच्या संदेशात मी विश्वासू होतो त्यामुळेमी पात्मनावाच्या बेटावर होतो.
10 प्रभूच्या दिवशी आत्म्याने माझा ताबा घेतला. माइया मागे मी एक मोठा आवाजऐकला. तो आवाज कर्ण्यासारखा ऐकू आला.
11 तो आवाज म्हणाला, “तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू पुस्तकात लिही,आणि सात मंडळ्यांना पाठव: इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकीया.”
12 माझ्याबरोबर कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, जेव्हा मी मागे वळालो, तेव्हा मी सोन्याच्या सातदीपसमया पाहिल्या.
13 मी कोणाला तरी दीपस्तंभामध्ये पाहिले जो “मनुष्याच्या पुत्रासारखा” होता. त्याने लांब पायघोळझगा घातला होता. त्याने सोन्याचा पट्टा छातीवर बांधला होता.
14 त्याचे डोके आणि केस बफर्ासारख्या पांढऱ्यालोकरीप्रमाणे शुभ्र होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते.
15 त्याचे पाय भट्टीत गरम झाल्यानंतर चमकणाऱ्या पितळासारखे होते. त्याचा आवाज पुराचे पाणी जसा आवाज करतेतसा होता.
16 त्याच्या उजव्या हातात सात तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली.तो दिवसाच्या मध्यान्ही अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.
17 जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या माणसा सारखा त्याच्या पायजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माइयावरठेवला आणि म्हणाला, “घाबरु नको! मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे,
18 मी मेलो होतो, पण पाहा; मीअनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माइया जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत.
19 म्हणून ज्या गोष्टी तूपाहतोस त्या लिही. ज्या गोष्टी आता घडत आहेत त्या लिही. आणि ज्या गोष्टी नंतर घडणार आहेत त्याही लिही.
20 जेसात तारे तू माइया हातात पाहिलेस आणि ज्यात सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे: सातदीपसमया या सात मंडळ्या आहेत. आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.