आमोस

1 2 3 4 5 6 7 8 9

धडा 3

1 इस्राएलच्या लोकांनो, संदेश ऐका! परमेश्वराने तुमच्याबद्दल पुढील गोष्टी सांगितल्या मी मिसरमधून ज्या घराण्यांना (इस्राएलला) आणले, त्यांच्याबद्दल हा संदेश आहे.
2 “पृथ्वीच्या पाठीवर पुष्कळ घराणी आहेत पण मी फक्त तुमच्याच घराण्याला खास संबंध ठेवण्यासाठी निवडले पण तुम्ही माझ्याविरुध्द गेलात. म्हणून तुमच्या सर्व पापांसाठी मी तुम्हाला शिक्षा करीन.”
3 दोन माणसांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकणार नाहीत.
4 शिकार मिळाल्यावरच जंगलातील सिंह गर्जना करील. जर सिंहाचा बछडा, त्याच्या गुहेत गुरगुरत असेल, तर त्याचा अर्थ त्याने काहीतरी पकडले आहे.
5 जाळ्यात दाणे नसतील तर, पक्षी जाळ्यात जाणार नाही आणि सापळ्याचे दार बंद झाले, तर तो सापळा पक्ष्याला पकडणारच.
6 जर इषाऱ्याची रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भीतीने थरथर कापणारच. जेव्हा नगरीवर संकट येते, तेव्हा परमेश्वर त्याला कारणीभूत असतो.
7 प्रभू माझा परमेश्वर कदाचित् काही करायचे निश्चित करील, पण तसे करण्यापूर्वी, तो, आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना सागेल.
8 सिंहाने डरकाळी फोडल्यास लोक भयभीत होतील व परमेश्वर बोलताच, संदेष्टे संदेश देतील.
9 अश्दोद व मिसर यांच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर या तेथे तुम्हाला भयंकर गोंधळ पाहायला मिळेल का? कारण लोकांना योग्य आचरण माहीत नाही. ते दुसऱ्यांशी क्रूरपणे वागले. दुसऱ्यांच्या वस्तू घेऊन त्यांनी त्यां उंच मनोऱ्यात लपवून ठेवल्या युध्दात लुटलेल्या वस्तूंनी त्यांचे खजिने भरून गेले आहेत.”
10
11 म्हणून परमेशवर म्हणतो, “त्या देशावर शत्रू चालून येईल तो तुमचे सामर्थ्य हिरावून घेईल. तुम्ही तुमच्या उंच मनोऱ्यांमध्ये लपविलेल्या वस्तू तो घेईल.”
12 परमेश्वर म्हणतो, “जर सिंहाने मेंढीवर हल्ला केला, तर कदाचित मेंढपाळ तिला वाचवायचा प्रयत्न करील. पण तो मेंढीचा काही भागच वाचवू शकेल. तो कदाचित् मेंढीचे दोन पाय वा कानाचा तुकडाच सिंहाच्या तोंडातून ओढून काढेल. त्याचप्रकारे इस्राएलमधील बहुतांश लोक वाचणार नाहीत. शोमरोनमध्ये राहणारे लोक शय्येचा एखादा कोपरा किंवा बिछान्याच्या कापडाचा तुकडाच फक्त वाचवू शकतील.”
13 माझा प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर देव पुढील गोष्टी सांगतो: “याकोबच्या वंशजांना (इस्राएलला) ह्या गोष्टींबद्दल ताकीद द्या.
14 इस्राएलने पाप केले व त्याबद्दल त्यांना शिक्षा करीन. मी बेथेलच्या वेदी नष्ट करीन. वेदीची शिगे तोडली जातील व ती मातीत पडतील.
15 हिवाळी महाल उन्हाव्व्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पूष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.