1 इतिहास
धडा 7
1 स्साखारला चार मुलगे होते. त्यांची नावे अशी: तोला, पुवा, याशूब आणि शिम्मोन.
2 उज्जी, रकाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे मुलगे. ते सर्व आपापल्या घराण्यातली प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत 22,600 इतकी झाली.
3 इज्रह्या हा उज्जीचा मुलगा. मिखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे मुलगे. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.
4 त्यांच्या घराण्यात 36,000 सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळीच्या नोंदीवरुन दिसते. बायका आणि मुले पुष्कळ असल्यामुळे यांचे घराणे मोठे होते.
5 इस्साखारच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून 87,000 लढवय्ये होते असे वंशावळींच्या नोंदींवरुन दिसते.
6 बन्यामीनला तीन मुलगे: बेला, बेकर आणि यदीएल.
7 बेलाला पाच मुलगे होते: एस्बोन, उज्जी, उज्जीयेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात 22,034सैनिक होते असे घराण्याच्या नोंदींवरुन दिसते.
8 जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेर चे मुलगे.
9 आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळीच्या नोंदीवरुन कळते. त्यांच्याकडे 20,200 सैनिक होते, हे ही त्यावरुन कळते.
10 यदीएलचा मुलगा बिल्हान. बिल्हानची मुले, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
11 यदीएलचे मुलगे हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे 17,200 सैनिक युध्दाला तयार होते.
12 शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा मुलगा हुशीम.
13 यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे मुलगे.हे सर्व बिल्हेचे वंशज.
14 मनश्शेचे वंशज खालील प्रमाणे:मनश्शे आणि त्याची अरामी दासी यांना अस्रीएल नावाचा मुलगा होता. माखीर हाही आणखी एक मुलगा होता. माखीर म्हणजे गिलादचा बाप.
15 हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका बाईशी माखीरने लग्न केले. तिचे नाव माका. माखीरच्या बहिणीचे ही नाव माका होते. या माकाचे दुसरे नाव सलाफहाद होते. हिला फक्त मुलीच झाल्या.
16 माखीरची बायको माका हिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या (माखीरच्या) भावाचे नाव शेरेश. शेरेशचे मुलगे ऊलाम आणि रेकेम.
17 ऊलामचा मुलगा बदान.हे झाले गिलादचे वंशज. गिलाद हा माखीरचा मुलगा. माखीर मनश्शेचा मुलगा.
18 माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे मुलगे झाले.
19 अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे मुलगे.
20 एफ्राईमची वंशावळ पुढीलप्रमाणे. एफ्राईमचा मुलगा शुथेलह एलादा.
21 एलादाचा मुलगा तहथ. तहथचा मुलगा जाबाद. जाबादचा मुलगा शुथेलह.गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरे मेंढरे चोरुन नेत होते.
22 एजेर आणि एलद हे एफ्राईमचे मुलगे होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.
23 मग एफ्राईमचा बायकोशी संबंध येऊन त्याची बायको गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. एफ्राईमने या मुलाचे नाव बरीया ठेवले. घरात आधी वाईट घडून गेल्यामुळे त्याने हे नाव ठेवले.
24 एफाईमच्या मुलीचे नाव शेरा. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि खालचे आणि वरचे उज्जनशेरा ही बांधली.
25 रेफह हा एफ्राईमचा मुलगा. रेफहचा मुलगा रेशेफ. त्याचा मुलगा तेलह. तेलहचा मुलगा तहन.
26 तहनचा मुलगा लादान. लादानचा मुलगा आम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा.
27 त्याचा मुलगा नून आणि नूनचा मुलगा यहोशवा.
28 एफ्राईमच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्या ठिकाणी ते राहत होते: बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान; र्पार्मिला गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी थेट अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत.
29 मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा मुलगा योसेफ याचे वंशज राहत होते.
30 इम्रा, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे मुलगे. त्यांची बहीण सेराह.
31 हेबेर, मालकीएल, हे बरीयाचे मुलगे. मालकीएलचा मुलगा बिर्जाविथ.
32 यफलेट, शोमर, होथाम हे मुलगे आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा बाप होता.
33 पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे मुलगे.
34 अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेरचे मुलगे.
35 शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे मुलगे सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.
36 सोफहचे मुलगे सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना,
37 बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.
38 यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे मुलगे.
39 आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे मुलगे.
40 हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते गुणसंपन्न शूर योध्दे होते. त्यांच्या वंशावळीच्या नोंदीप्रमाणे 26,000 लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.